श्री साईबाबांची धूप आरती

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।चरणरजातळी । द्यावा दासा विसावा । भक्ता विसावा ॥ आरती... ॥

जाळुनिया अनंग । स्वस्वरूपी राहे दंग ।मुमुक्षू जनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥ डोळां श्रीरंग ॥ आरती... ॥

जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥ तुझी ही माव ॥ आरती... ॥

तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥ दाविसी अनाथा ॥ आरती... ॥

कलियुगी अवतार । सगुण परब्रह्म साचार ।अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥ दत्त दिगंबर ॥ आरती... ॥

आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥ भय निवारी ॥ आरती... ॥

माझा निज द्रव्य ठेवा । तव चरण रज सेवा ।मागणें हेचि आता । तुम्हां देवाधिदेवा ॥ देवाधिदेवा ॥ आरती... ॥

इच्छित दिन चातक । निर्मळ तोय निज सुख ।पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥ आपुली भाक ॥ आरती... ॥

शिर्डी माझे पंढरपूर । साईबाबा रामावर ॥शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ॥

या हो या हो अवघे जन । करू बाबांसी वंदन ॥गणू म्हणे बाबा साई । धाव पाव माझे आई ॥

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ॥प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन । भावे ओवाळीन म्हणे नामा ॥ १ ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव । त्वमेव सर्वम् मम देव देव ॥ २ ॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ॥करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं । जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥ ४ ॥

अनंता तुला तें कसें रे स्तवावें । अनंता तुला तें कसें रे नमावें ॥अनंत मुखांचा शिणे शेष गातां । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ १ ॥

स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें । उरावें तरी भक्तिसाठी स्वभावें ॥तरावें जगा तारुनी मायताता । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ २ ॥

वसे जो सदा दावया संतलीला । दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला ॥परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ ३ ॥

बरा लाधला जन्म हा मानवाचा । नरा सार्थका साधनीभूत साचा ॥धरूं साईप्रेमा गळाया अहंता । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ ४ ॥

धरावें करीं सान अल्पज्ञ बाला । करावें आम्हां धन्य चुंबोनि गाला ॥मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ ५ ॥

सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताती । शुकादिक ज्यांतें समानत्व देती ॥प्रयागादि तीर्थेपदीं नम्र होतां । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ ६ ॥

तुझ्या ज्या पदा पाहतां गोपबाली । सदा रंगली चित्स्वरूपी मिळाली ॥करी रासक्रीडा सवें कृष्णनाथा । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ ७ ॥

तुला मागतों मागणें एक द्यावें । करा जोडितों दीन अत्यंत भावें ॥भवी मोहनीराज हा तारीं आतां । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ ८ ॥

ऐसा येई बा । साई दिगंबरा ।अक्षयरूप अवतारा । सर्वही व्यापक तू ।श्रुतीसारा । अनुसूयात्रिकुमारा । ऐसा येई बा ॥

काशी स्नान जप । प्रतिदिवशी । कोल्हापूर भिक्षेसी ।निर्मळ नदी तुंग । जल प्राशी । निद्रा माहूर देशी ॥ ऐसा येई बा ॥ १ ॥

झोळी लोंबतसे । वाम करी । त्रिशूळ डमरू धारी ।भक्ता वरद सदा । सुखकारी । देशील मुक्ती चारी ॥ ऐसा येई बा ॥ २ ॥

पायी पादुका । जपमाळा । कमंडलू मृगछाला ।धारण करिशी बा । नागजटा मुगुट । शोभतो माथा ॥ ऐसा येई बा ॥ ३ ॥

तत्पर तुझ्या या जे ध्यानी । अक्षय त्यांचे सदनी ।लक्ष्मी वास करी । दिनरजनी । रक्षिसी संकट वारुनी ॥ ऐसा येई बा ॥ ४ ॥

यापरी ध्यान तुझे गुरराया । दृश्य करी नयना या ।पूर्णानंद सुखे ही काया । लाविसी हरीगुण गाया ॥ ऐसा येई बा ॥ ५ ॥

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।स मे कामान्कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॥

ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं ।समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिति ॥

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे ।आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

Sai Baba Dhoop Aarti in Marathi — Amrit Vani