घेउनिया पंचारती ।करू बाबांची आरती ।साईसी ।करू बाबांची आरती ॥ १ ॥
उठा उठा हो बांधव ।ओवाळू हा रमाधव ।साई रमाधव ।ओवाळू हा रमाधव ॥ २ ॥
करुनिया स्थिर मन ।पाहू गंभीर हे ध्यान ।साईचे हे ध्यान ।पाहू गंभीर हे ध्यान ॥ ३ ॥
कृष्णनाथ दत्तसाई ।जडो चित्त तुझे पायी ।चित्त बाबा पायी ।जडो चित्त तुझे पायी ॥ ४ ॥
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।चरणरजतळीं द्यावा दासां विसांवा, भक्तां विसांवा ॥ धृ ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग ।मुमुक्षुजनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥ १ ॥
जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥ २ ॥
तुमचे नाम ध्यातां । हरे संसृती व्यथा ।अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥ ३ ॥
कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार ।अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥ ४ ॥
आठां दिवसां गुरूवारीं । भक्त करिती वारी ।प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥ ५ ॥
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा ।मागणें हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा ॥ ६ ॥
इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख ।पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥ ७ ॥
जय देव जय देव दत्ता अवधूता । साई अवधूता ।जोडूनी कर तव चरणीं ठेवितो माथा ॥ जय देव जय देव ॥ धृ ॥
अवतरसीं तूं येता धर्मातें ग्लानी । नास्तिकांही तूं लाविसि निजभजनीं ।दाविसि नाना लीला असंख्य रूपांनीं । हरिसी दीनांचें तूं संकट दिनरजनीं ॥ १ ॥
यवनस्वरूपीं एक्या दर्शन त्वां दिधलें । संशय निरसुनियां तदद्वैता घालविलें ।गोपीचंदा मंदा त्वांची उद्धरिलें । मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियलें ॥ २ ॥
भेद न तत्त्वीं हिंदू-यवनांचा कांहीं । दावायासी झाला पुनरपि नरदेही ।पाहसि प्रेमानें तूं हिंदू-यवनांही । दाविसि आत्मत्वाने व्यापक हा साई ॥ ३ ॥
देवा साईनाथा त्वत्पदनत व्हावें । परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें । देशिल तरी दे त्वद्यश कृष्णानें गावें ॥ ४ ॥
शिरडी माझें पंढरपूर । साईबाबा रमावर ॥ १ ॥
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ॥ २ ॥
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ॥ ३ ॥
गणू म्हणे बाबा साई । धांव पाव माझे आई ॥ ४ ॥
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ।प्रेमें आलिंगिन आनंदें पूजिन । भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।करोमि यद्यत्सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥
अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं । जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥
हरे राम हरे राम । राम राम हरे हरे ।हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ ५ ॥
अनंता तुला तें कसें रे स्तवावें । अनंता तुला तें कसें रे नमावें ।अनंत मुखांचा शिणे शेष गातां । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ १ ॥
स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें । उरावें तरी भक्तिसाठी स्वभावें ।तरावें जगा तारूनी मायताता । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ २ ॥
वसे जो सदा दावया संतलीला । दिसे अज्ञ लोकापरी जो जनांला ।परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ ३ ॥
बरा लाधला जन्म हा मानवाचा । नरा सार्थका साधनीभूत साचा ।धरूं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ ४ ॥
धरावें करीं सान अल्पज्ञ बाला । करावें आम्हां धन्य चुंबोनि गाला ।मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ ५ ॥
सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताती । शुकादिक ज्यांतें समानत्व देती ।प्रयागादि तीर्थेपदीं नम्र होतां । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ ६ ॥
तुझ्या ज्या पदा पाहतां गोपबाली । सदा रंगली चित्स्वरूपी मिळाली ।करी रासक्रीडा सवें कृष्णनाथा । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ ७ ॥
तुला मागतों मागणें एक द्यावें । करा जोडितों दीन अत्यंत भावें ।भवी मोहनीराज हा तारिं आतां । नमस्कार साष्टांग श्रीसाइनाथा ॥ ८ ॥
ऐसा येई बा । साई दिगंबरा । अक्षयरूप अवतारा । सर्वहि व्यापक तूं । श्रुतिसारा । अनुसयाऽत्रिकुमारा । ऐसा येई बा ॥ धृ ॥
काशी स्नान जप प्रतिदिवशीं । कोल्हापूर भिक्षेसी । निर्मळ नदी तुंगा जल प्राशी । निद्रा माहूर देशीं । ऐसा येई बा ॥ १ ॥
झोळी लोंबतसे वाम करीं । त्रिशूळ डमरूधारी । भक्ता वरद सदा सुखकारी । देशील मुक्ती चारी । ऐसा येई बा ॥ २ ॥
पायी पादुका जपमाळा । कमंडलू मृगछाला । धारण करिशी बा नागजटा । मुगुट शोभतो माथां । ऐसा येई बा ॥ ३ ॥
तत्पर तुझ्या या जे ध्यानीं । अक्षय त्यांचे सदनीं । लक्ष्मी वास करी दिनरजनीं । रक्षिसि संकट वारुनि । ऐसा येई बा ॥ ४ ॥
या परि ध्यान तुझें गुरूराया । दृश्य करीं नयनां या । पूर्णानंदसुखें ही काया । लाविसि हरिगुण गाया । ऐसा येई बा ॥ ५ ॥
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।स मे कामान्कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः ॥
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ॥
तदप्येष श्लोकोऽभिगीतो । मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे ।आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि ॥