ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा । माझ्या साईनाथा ।पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आतां ॥
निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली । बाबा आकारा आली ।सर्वाघटीं भरूनि उरली साई माऊली ॥ ओवाळू० ॥
अष्टमा सात्त्विक भावांचे करूनी ताट । बाबा करूनी ताट ।त्यांतूनि उजळले हे ज्ञानदीप उज्वळ ॥ ओवाळू० ॥
माझ्या जीवा भावाची केली कुरवंडी । बाबा केली कुरवंडी ।तोचि भाव पंचप्राण आरती ओवाळू ॥ ओवाळू० ॥
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।चरणरजातळीं । द्यावा दासा विसावा । भक्ता विसावा ॥ आरती ॥
जाळुनिया आनंग । स्वस्वरुपी राहे दंग ।मुमुक्षू जनां दावी । निज डोळा श्रीरंग ॥ आरती ॥
जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥ आरती ॥
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥ आरती ॥
कलियुगी अवतार । सगुण ब्रह्म साचार ।अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥ आरती ॥
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥ आरती ॥
माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरज सेवा ।मागणें हेचि आता । तुम्हां देवाधिदेवा ॥ आरती ॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । बाबा करा अवधूता ।चिन्मय सुखधामीं जागुनि जागविसी आतां ॥
पुरले मनोरथ जातो आपुले गांवा । बाबा आपुले गांवा ।तुम्हांसीं आमुचा रामराम घ्यावा ॥आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता ॥
पाहें प्रसादाची वाट । घ्यावे धुवूनियां ताट ॥शेष घेऊनि जाईन । तुमचें झालियां भोजन ॥
झालो आतां एकसवा । तुम्हां आळवितो देवा ॥तुका म्हणे आतां चित्त । करुनि राहिलों निश्चित ॥
पावला प्रसाद आतां विठ्ठो निष्काम ।चरण तुझे देवा आम्हां सांपडले वर्म ॥
सदा सत्स्वरुपं चिदानंदकंदं । जगत्संभवस्थानसंहारहेतुम् ।स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं । नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् ॥
भवध्वान्तविध्वंसमार्तण्डमीड्यं । मनोवागतीतं मुनीर्ध्यानगम्यम् ।जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां । नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् ॥
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा ।श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् ।विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व ।जय जय करुणाब्धे श्रीप्रभो साईनाथ ॥
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ॥